१ मेंपासून समृद्धी महामार्गावरून नागपूर- शिर्डी प्रवास होणार: मुख्यमंत्र्यांनी घोषणा

0

अमरावती: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्गाबद्दल मोठी घोषणा केली आहे. नवीन वर्षात १ मेपर्यंत समृद्धी महामार्गावरुन नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

अमरावती जिल्ह्यातील शिवणी (रसूलपूर) येथे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले.