२०० कंपन्यांवर कारवाई होणार, प्रवर्तकांवर १० वर्षांची बंदी

0

नवी दिल्ली : देशातील प्रमुख शेअर बाजार असलेल्या बीएसईने २०० कंपन्यांचे सूचीतील स्थान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपन्यांच्यामागे असलेल्या प्रवर्तकांवरही १० वर्षांची बंदी घालण्याचा निर्णयही बीएसईने घेतला आहे. २३ ऑगस्टला कंपनी सूचीमधून या कंपन्यांना काढून टाकण्यात येणार आहे. ३३१ खोट्या कंपन्यांवर सेबी कारवाई करीत आहे. सुची स्थान गमावणाऱ्या छद्मी कंपन्यांमधेय एथिना फायनान्सियल सर्व्हिस, अंकूर ड्रग्ज, ब्लू बर्ड, क्रू बॉक्स, कुटोन्स रिटेल, पर्ल इंजिनीयरिंग, अरिहंत इंडस्ट्रीज आदी कंपन्यांचा समावेश आहे.