नागपूर-राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अध्यादेश काढणार नसल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे तसेच तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
राम मंदिराबाबत मोदी काहीही सांगत असतील परंतू यावर माझी भुमिका मात्र स्पष्ट आहे. रामाप्रती आमची आस्था असल्याने रामाचे मंदिर अयोध्येतील त्याच जागेवर बनायला हवे असे भागवत यांनी सांगितले. आमची भूमिका आपण संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी स्पष्ट केली आहे असेही ते म्हणाले.