२०१९ ला परळीचा आमदार मीच असेल- धनंजय मुंडे

0

परळीतील 500 कोटी रुपयांच्या 80 मेगावॅटच्या सोलार पॉवरचे उदघाटन

परळी-औष्णिक वीज निर्मितीमुळे देशाच्या नकाशावर असलेल्या परळी शहरात आता सौर ऊर्जेची निर्मिती होऊ लागल्यामुळे या भागाची नवी ओळख निर्माण झाली आहे. भविष्यात या प्रकल्पामुळे या भागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल , या भागातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न मीच पूर्ण करुन दाखवेल असा विश्वास विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला आहे. 2019 ला या भागाचा आमदार मीच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे ५०० कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या ८० मेगावॅट खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे उदघाटन आज ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

या प्रकल्पाचे उदघाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते मात्र हवामान बदलामुळे त्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की , आपल्या भागाच्या विकासासाठी स्वर्गीय पंडितअण्णा मुंडे यांनी कष्टाने तयार केलेली जमीन आपण दिली त्याच बरोबर या भागातील शेतक-यांनी जमिनी दिल्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला आहे.

सर्वे झाल्यावर इथल्या लोकप्रतिनिधीला जाग

परळी तालुक्यातील जनतेचे एम.आय.डी.सी. चे स्वप्न आहे. सिरसाळा भागात त्यासाठी आपण उद्योग मंत्री यांच्या सोबत बैठका घेतला पाठपुरावा सुरू केला आहे .त्यामुळे सर्वे झाला आहे हे स्वप्न मीच पूर्ण करेल असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला. सर्वे झाल्यावर इथल्या लोकप्रतिनिधीला जाग येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. या भागात खाजगी साखर कारखाना उभारणीचे काम सुरू असून ते ही लवकरच पूर्ण करू असा शब्द त्यांनी दिला.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमास बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री बजरंग सोनवणे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, जेष्ठ नेते बाळासाहेब आजबे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बन्सीअण्णा सिरसाट, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई फड, महेंद्र गर्जे, नरहरराव निर्मळ, तालुकाध्यक्ष ऍड गोविंदराव फड, पंचायत समिती सभापती मोहनराव सोळंके, मार्केटचे सभापती सूर्यभान मुंडे, उपनगराध्यक्ष आयुबभाई पठाण, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष रणजित लोमटे, उपसभापती तानाजीराव देशमुख, बबनराव लोमटे, शिवहार भताने, विलासकाका सोनवणे, गणेश देशमुख, जि प सदस्य प्रा. मधूकर आघाव, उपसभापती पिंटू मुंडे, संतोष शिंदे, जानेमिया कुरेशी, माजी शहराध्यक्ष चंदूलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, गटनेते वाल्मिकअण्णा कराड, माऊली गडदे, डॉ संतोष मुंडे, विष्णुपंत देशमुख, सिराज भाई, युवक नेते अभय मुंडे, सतीश बडे, दादासाहेब मुंडे , राजाभाऊ पौळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शापुरजी पालनजी चे नितीन गांधी, सुनील कुलकर्णी, जरीन मिस्त्री, युवक नेते , जि. प सदस्य अजय मुंडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक अजय मुंडे यांनी केले.

कार्यक्रमास तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचलन माधव चाटे यांनी केले तर प्रा. मधुकर आघाव यांनी आभार मानले.