नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल भूजल योजनेचा शुभारंभ केला आहे. सोबतच मोदींनी अटल टनल योजनेचाही उद्घाटन केले. दिल्लीतील विज्ञान भवनात येथे आयोजित कार्यक्रमात मोदींनी या योजनेची घोषणा करत शुभारंभ केला. यावेळी मोदींनी अटल बिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना अभिवादन केले. अटल भूजल योजना भूजल पातळी वाढविण्यावर भर देणार आहे.
लेह-लेह-लद्दाख आणि कारगिलचा भाग्य अटल टनल योजनेने बदलणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहोचविणार असल्याचे मोदींनी सांगितले. २०२४ पर्यंत ‘हर-घर जल’ अशी घोषणा मोदींनी केली.