२०२४ मध्ये आमचीच सत्ता येणार : नाना पटोले

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरलं नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इतर दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आज देशामध्ये भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस आहे. भाजपाने केंद्रामध्ये बसून देश विकायला काढला आहे, देश विकला. लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. काही लोकांना तर असं वाटतं आहे की करोना परवडला पण ही महागाई परवडत नाही. असं लोक आता बोलू लागले आहेत. भाजपाने करोना आणि महागाई या दोन्हीचा संगम करुन आता देशातल्या लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. म्हणूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये केंद्रात सरकार तयार होणारच असल्याचं पटोले म्हणाले,