जळगाव – प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या आदेशानुसार डिजीटल सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. या नोंदणी अभियानाची पध्दत अतिशय
शिस्तबध्द आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आता जोमाने कामाला लागला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये मोदींना पुन्हा गुजराथला रवाना करायचेय असे विधान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज एका कार्यक्रमात केले.
काँग्रेस पक्षातर्फे डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरवात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, मुफ्ती हारून नदवी, महानगराध्यक्ष शाम तायडे आदी उपस्थित होते.
अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलतांना डॉ. उल्हास पाटील यां नी सांगितले की, काँग्रेस पक्षाकडुन प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या यशाच गमक हे केवळ ईव्हीएममध्येच आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान झाल्यास ‘दुध का दुध, पानी का पानी’ राहणार नसल्याचेही डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.