अतिक्रमणमुक्त जळगावातील रस्त्यांची संकल्पना हाती घेतलेल्या जळगाव महानगर पालिकेने अतिक्रमधारकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यात आज शहरातील भिलपूरा पोलीस चौकी ते टॉवर चौक दरम्यान उजव्या बाजूने असलेल्या अतिक्रमणे यात लहान मोठ्या पत्री शेड,ओटे अशा २१ अतिक्रमण धारकांवर कारवाई केली आहे.
हे देखील वाचा
शहरातील ज्या-ज्या रस्त्यांवर अशा अवैध अतिकानांमध्ये वाढ झाली आहे. त्या-त्या सर्वच ठिकाणी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या करावाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी नागरिकांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमणे न करता आपापल्या जागेतच रहावे किंवा स्वतःहून अतिक्रमण काढून मनपाला सहकार्य करावे असे आवाहन परत एकदा करण्यात येत असल्याचे मनपा अतिक्रमण विभागाने स्पष्ट केले असून जो या मोहिमेस विरोध करेल त्यांचेवर कायदेशीर कार्यवाह्या देखील करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी मनपा कडून कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते. त्यात नगर रचना विभागाचे प्रसाद पुराणिक,चित्र शाखेचे सुभाष मराठे,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमृतकार, ईस्माईल शेख,नाना कोळी,नितीन भालेराव,किशोर सोनावणे,दिलीप ढंढोरे यांचा समावेश होता.