मुंबई: जगात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. कोरोना योद्धांची भूमिका निभावणारे देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना काळात पोलीस प्रशासनाने कोरोना योद्धांची भूमिका निभावली आहे. मात्र कोरोना योद्धांनाच कोरोनाचा सामना करावा लागतो आहे. महाराष्ट्रातील आतापर्यंत १३ हजार १८० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मागील २४ तासात महाराष्ट्र ३०३ पोलीस कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यात एका दिवसात ५ पोलिसांचा मृत्यूही झाला आहे.
१३१८० पैकी ९५९५ पोलिसांनी कोरोनाला हरविले आहे. सध्या २३८९ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. दुर्दैवाने आतापर्यंत १३६ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.