जळगाव – शहर महापालिकेच्या महासभेचे आयोजन २४ मार्च रोजी करण्यात आहे . या महासभेत तब्बल २५५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार आहे. इतक्या मोठ्या निधीतून होणाऱ्या कामांचे तब्बल ४६८ प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेची स्थापना झाल्यापासून प्रत्येक प्रभागनिहाय कामांसाठी तब्बल २५५ कोटींच्या कामांना मंजुरी देणारी ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी महासभा ठरणार आहे.
या महासभेत जिल्हा नियोजन समिती, नगरोत्थान, दलित वस्ती सुधार, मनपा फंड अशा विविध निधीच्या माध्यमातून सुमारे २५५ कोटी रुपयांच्या निधितून ४६८ कामांचे प्रस्ताव महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीतून केवळ रस्त्यांची कामे केली जाणार असल्याने, आता इतर निधीतून कॉलनी भागातील रस्त्यांची कामे केली जाणार आहेत.
४६८ कामांच्या प्रस्तावात १२० कामे ही गटारींची आहेत. त्यात ज्या भागात भुयारी गटार योजनेचे काम झाले आहेत. अशा भागातच गटारींची कामे घेण्यात येणार आहेत. या गटारींमधून केवळ पावसाचे पाणी जाणार असून, या पावसाच्या पाण्यासाठी मनपाकडून पैसा ओतण्यात आला आहे. २५५ कोटींच्या कामांमध्ये गटारी, हायमस्ट, पेव्हर ब्लॉक, चेन्सलिंक फेन्सिंक च्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. गटारी, हायमस्ट व पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात मार्जीन मिळते,यामुळे अनेक नगरसेवकांचा भर या कामांमध्येच दिसून येत आहे. शहरातील ४० टक्के भागात भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले आहे. ओपन गटारींचा वापर केवळ पावसाच्या पाण्यासाठीच केला जाणार आहे. त्यामुळे तब्बल १० ते १५ कोटींचा निधी केवळ पावसाच्या पाण्यासाठीच केला जाणार आहे.
महत्वाचे प्रस्ताव
गटारींच्या कामांचे प्रस्ताव – १२०
डांबरीकरणाचे प्रस्ताव – १३४
कॉक्रींटीकर्णाचे प्रस्ताव – ८९