नंदुरबार: नागरिकत्व नोंदणी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी संविधान संवर्धन कृती समितीने २४ रोजी नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबार येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या दिवशी शहरातील नेहरू पुतळा परिसरात विविध संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येत शांततेत बंदचे आव्हान करण्यात येणार आहेत. तसेच प्रकाशा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अरुण रामराजे, नथु साळवे, दिलावर शाह, एजाज बागवान, आदींनी दिली.