२५ जानेवारीला फक्त ‘ठाकरे’च,अन्य कोणताही चित्रपट नाही: शिवसेना नेता

0

मुंबई :बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता चित्रपट रिलीझ होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, शिवसेनेच्या चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्याने सिनेनिर्मात्यांना इशारा दिला कि, ठाकरे चित्रपट शिवाय अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकीने मुख्य भूमिका साकारली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेशी संबंधित चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी फेसबुकवर टाकलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली. ‘ठाकरे चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे, या तारखेला अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही’, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे. तर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बाळा लोकरे यांनी ‘२५ जानेवारीला अन्य चित्रपट प्रदर्शित झाल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ’, असेही सांगितले.