मुंबई: जागतिक कस्टम दिनाचे औचित्य साधून येत्या २६ जानेवारी २०१९ रोजी ‘कस्टम कप रेगाटा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भारतातील एकमेव स्पर्धा असून ज्यात भारतभरातून नामांकित असलेले नौकानयनपटू तसेच यौर्ट क्लब सामील होत आहे.
२६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे दुपारी २ वाजता ही स्पर्धा होणार आहे. यावेळी आरमार आपले प्रात्यक्षिक दाखवणार आहेत .यावर्षी तब्बल ६० नौका दल या स्पर्धेत सहभागी होतील स्पर्धा ही रोमांचक अनुभव देणारी ठरणार असून प्रत्यक्ष स्पर्धा पहायचा अनुभव नागरिकांना अनुभवता येणार आहे.