२६/११ हल्ल्याची फेरचौकशी करा; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

0

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा म्हणजेच 26/11 प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत भातखळकर यांनी ही मागणी केली आहे. या पुस्तकात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला हिंदू दहशतवादी भासवण्याचा प्रयत्न झाला, असा उल्लेख मारिया यांनी केला आहे. या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी भातखळकर यांनी मागणी केली आहे.

माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचे ‘लेट मी से इट नाऊ’ हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले आहे. यात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. मुंबईवरील 26/11 हल्ल्याबाबतही मारियांनी गौप्यस्फोट केला