२६/११ हल्ल्यात एकही मुस्लिम ठार झाला नाही; मेघालयाच्या राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

0

शिलॉंग- मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली आहेत. हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानिमित्ताने मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केलेल्या एका टि्वटवरुन वाद निर्माण झाला आहे. या टि्वटमध्ये तथागत रॉय यांनी भारत-पाकिस्तानसंबंधांबद्दल प्रश्न उपस्थित करतानाच २६/११ च्या हल्लेखोरांनी मुस्लिमांना सोडून इतरांचे बळी घेतले असे म्हटले होते.

आपल्या टि्वटवरुन वाद झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ते टि्वट डिलीट करुन माफी मागितली. मुंबईवरील २६/११ हल्ल्यासंबंधी आपल्याला चुकीची माहिती देण्यात आली. अनेक मुस्लिमही या हल्ल्यात मारले गेले. तथ्याच्या बाबतीत ही चूक झाली असून मी त्याबद्दल माफी मागतो असे त्यांनी नव्या टि्वटमध्ये म्हटले आहे.