२७ नोव्हेंबरपासून ‘गोवर आणि रुबेला’ लसीकरण मोहीम

0

पुणे : गोवर आणि रुबेला हा विषाणूजन्य आजारवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने येत्या २७ नोव्हेंबर पासून संपूर्ण शहरात ‘गोवर रुबेला’ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये ९ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना हा लसीकरण करण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय लसीकरण मोहिमे यशस्वी करण्यासाठी व शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी शहरातील सर्व संस्था, हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी येथे केले.

याबाबत आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, भारत सरकारने सन २०१८ सालांपर्यंत रुबेला आजाराचे संपूर्ण देशातून निर्मूलन व या आजारावर नियंत्रण करण्याचे ठरवले आहे. शहरातील सर्व शाळां, खाजगी, इंग्रजी, कॉन्व्हेन्ट, मिशनरी, अल्पसंख्यांक शाळांमध्ये देखील ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संस्थांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.