२ विमानांची टक्कर होऊन वैमानिकाचा मृत्यू

0

ओटावा : २ विमानांची अवकाशातच टक्कर. ही घटना कॅनेडामध्ये घडली आहे. या अपघातात लहान प्रवासी विमानाच्या वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.

सेसेना नावाचे लहान प्रवासी विमानाची पायपर विमानाला खालच्या बाजूने धडक बसली. यामध्ये पायपर विमानाचा लँडिग गियर खराब झाला. या अपघातानंतर ताबडतोब पायपर विमानाला ओटावा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. त्यामुळे या विमानाचा वैमानिक आणि प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, सेसना विमानाच्या वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला.