‘२.०’ बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर

0

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा ‘२.०’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत आहे. हा चित्रपट सगळ्यांचे रेकॉर्ड्स मोडत अवघ्या चारच दिवसात ४०० कोटींची कमाई केली आहे.

हा चित्रपट २९ नोव्हेंबरला तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ३डी तंत्रज्ञान, स्पेशल ईफेक्ट्स, ग्राफिक्सचा यात पुरेपुर वापर करण्यात आला आहे. आठवड्याच्या शेवटीही या चित्रपटाच्या कमाईत विक्रमी वाढ झाली. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.