पालकमंत्र्यानी तासाभरात गुंडाळला जिल्ह्याचा आढावा
जळगाव – ३० मिनिटे डिपीडिसी २० मिनिटे टंचाई आणि अवघ्या १० मिनिटांत ३०० कोटीच्या कामांचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी करून जळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्याचा आढावा तासाभरात आज गुंडाळला.
कॅबीनेट बैठकीचे निमित्त पुढे करून पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा जिल्ह्यासाठी कुठलीही ठोस घोषणा न करताच धावता दौरा केला. आजच्या या बैठकिकडे बहुतांश आमदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. बैठकिला ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आ. एकनाथ खडसे, खा. रक्षा खडसे, ना. उज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, आदी उपस्थित होते. तर बैठकीत आ. हरीभाऊ जावळे, आ. संजय सावकारे, आ. स्मिता वाघ, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. राजुमामा भोळे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, नगराध्यक्ष सुनील काळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.