३० वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह; २५० जणांचे अहवाल निगेटीव्ह

0

जळगाव– भुसावळ येथील गंगाराम प्लॉट, प्रोफेसर कॉलनी, शनी मंदिर, रामदासवाडी व इतर ठिकाणच्या 251 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 250 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर एका 30 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 382 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.