३० हजार शेतकऱ्यांचा सहभाग असलेली पदयात्रा दिल्ली-युपी सीमेवर धडकली

0

नवी दिल्ली- कर्जमाफी तसेच कमी पैशात वीज उपलब्ध करुन देण्यासहित शेतकऱ्यांच्या एकूण २१ मागण्यांसाठी भारतीय किसान युनिअनने (बीकेयू) पुकारलेली ‘किसान क्रांती पदयात्रा’ काढली आहे. हे पदयात्रा दिल्ली-उत्तर प्रदेश सीमारेषेवर पोहोचली आहे. या पदयात्रेत जवळपास ३० हजार शेतकरी सहभागी झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकरी राजधानी दिल्लीत दाखल होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीत १४४ जमावबंदी कलम लागू करण्यात आले आहे.

या पदयात्रेत उत्तर प्रदेशासहित हरियाणामधील शेतकरी सहभागी झाले आहेत. २३ सप्टेंबरला हरिद्धारमधून पदयात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी १ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा विस्कटल्यानंतर शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. शेतकऱ्यांचा दिल्ली प्रवेश रोखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदी कलम लागू कऱण्यात आलं आहे. तसंच उत्तर प्रदेश-प दिल्ली सीमारेषा बंद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दिल्ली प्रवेशाची परवानगी देण्यात आलेली नाही. दरम्यान पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात राहणाऱ्या रमेश यादव, जे हरिद्धवारपासून पदयात्रेत सहभागी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. कधीपर्यंत ते अशाच प्रकारे पदयात्रा काढत राहणार आहेत ? स्वामीनाथन अहवाल लागू करण्याचा आमची मागणी आहे. देशभरात पेट्रोल, डिझेल आणि वीजेचा दर वाढत असल्याने शेतकरी हतबल आहेत. सरकारने तर १० वर्ष जुने ट्रॅक्टर शेतात नेले जाऊ शकत नाहीत असा आदेश जारी केला आहे. आम्ही नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणणार ? अनेक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे हाल होत आहेत’.