पुणे : फुरसुंगी ,उरळी देवाची येथील कचरा डेपो ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत बंद करण्यात येईल. देवाची उरळी, फुरसुंगी येथील कचरा डेपो, तसेच विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर या दोन्ही गावांमधील ग्रामस्थ, या बैठकील उपस्थित होते. या डेपोत दररोज १ हजार मेट्रीक टन कचरा येतो. त्यामधील ५०० मेट्रीक टन कचरा ३१ मार्चपर्यंत कमी केला जाणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील ५ गावांमध्ये प्रत्येकी १०० टनांचे प्रक्रिया प्रकल्प सुरू करून तिथे हा कचरा जिरवला जाईल. उर्वरित ५०० टन कचरा कमी करत डिसेंबर २०१९ अखेर डेपोत कचरा आणण्याचे काम थांबवले जाईल.उरळीचा कचरा डेपो डिसेंबर २०१९अखेर पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.