३१ संभाव्य फुटबॉलपटूंचा भारतीय संघाची घोषणा

0

नवी दिल्ली : ३१ संभाव्य भारतीय फुटबॉलपटूंचा समावेश असलेला संघ मुख्य प्रशिक्षक स्टीफन कांस्टेन्टाइन यांनी जाहीर केला आहे. यात चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. यामध्ये नीशू कुमार, सुभाशीष बोस, जेरी लालरिनजुआला आणि मीलन सिंह यांचा समावेश आहे. कांस्टेन्टाइन यांनी २८ मार्च रोजी यांगोन येथे म्यानमारविरुद्ध होणाऱ्या एएफसी आशियाई चषक पात्रता युएई २०१९ च्या ‘अ’ गटातील होणाऱ्या सामन्यासाठी भारताचा वरिष्ठ संघ शिबिरासाठी निवडला आहे.

खेळाडूंचे मुंबईत शिबिर घेण्यात येईल. कांस्टेन्टाइन म्हणाले की, मुंबईचे वातावरण हे यांगूनसारखे आहे. त्यामुळे मुंबईची निवड करण्यात आली. सर्व खेळाडू १२ मार्चनंतर मुंबईत एकत्र होतील. आम्ही आय-लीग आणि आयएसएलच्या कामगिरीवरून खेळाडूंची निवड केली आहे. भारतासाठी खेळणाऱ्या खेळाडूंसाठी दार उघडे आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला तसा खेळही करून दाखवावा लागेल.

संभावित खेळाडू असे : सुब्रत पॉल, गुरप्रीत सिंह संधू, अमरिंदर सिंह, टीपी रेहनीश. बचावपटू : प्रीतम कोटल, नीशू कुमार, संदेश झिंगन, अर्णव मंडल, अनास एदाथोडिका, धनपाल गणेश, फुलगांको कोर्डोजो, नारायण दास, सुभाशीष बोस, जेरी लालरिनजुआला. मध्यरक्षक : जॅकचंद सिंह, सेतीयेसन सिंह, उदांता सिंह, यूजेनसन लिंगदोह, मीलन सिंह, प्रणय हलदर, मोहम्मद रफीक, राउलिन बोर्जेस, हलीचरण नारजारी, सीके विनीत, एंथोनी डीसूजा, आईसैक वनलालसावमा. आघाडीपटू : जेजे लालकेफुलवा, सुमीत पास्सी, सुनील छेत्री, डेनियल लालहिमपुईया, रॉबिन सिंह.