३३ गावांमध्ये थेट जनतेतुन सरपंच

0

१५ ते २२ सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज ; ७ ऑक्टोंबरला मतदान; ९ ऑक्टोंबरला मतमोजणी

साक्री तालुक्यात २० ग्रामपंचरीतींवर महिला सरपंचाचे आरक्षण

निजामपुर । साक्री तालुक्यातील ३३ गावांतील सरपंचाची निवड ही लोकनियुक्त होणार आहे. कार्यकर्त्यांनी आता पासुनच गुडघ्राला बाशिंग बांधून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी२०१८ या कालावधीत मुदत संपणारी या तालुक्यातील भामरे, बळसाणे, जाभोरे, वरसुस, कालदर, भोनगाव, सुकापुर दरेगाव, खरडबारी वाकी भडगाव (व) नागपुर(व) कुडाशी जमखेल.पंगण, काळटेक पिपळगाव बु. बसरावळ चरणमाळ, कासारे, तमासवाडी, वसमार, धाडणे पेटले उभंड पानखेडा, खरगाव, दहिवेल किरवाडे.जंभोरे, आमोडे देशीरवाडे, देगाव, भाडणे असे ३३ गावाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आले आहे.

राजकीर पक्षांकडून चाचपणी
थेट जनतेतुन सरपंच निवड होणार असल्याने मुख्य राजकीय पक्ष भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विविध पक्षांकडून उमेदवार चाचणीला सुरुवात झाली आहे. विविध गावात महिला आरक्षण असल्याने यात कभी खुशी गभी गम अशी स्थीती झाली आहे. गावातील हौशे तरुण युवा कार्यकर्त्यांनी आता पासुन गुडघ्याला बाशिंग बाधुन रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

सरपंचपदासाठी असणार चुरस
१५ ते २२ सप्टेंबर २०१७ दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. २५ सप्टेंबरला छाननी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २७ सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत दिली आहे. साक्री तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीसाठी मतदान ७ ऑक्टोंबर होत असुन ९ ऑक्टोेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील बळसाणे, भामेर, पेटले, वरसुस, उभंड, जाभोरे पंगण असे विविध ग्रामपंचायतीचा समावेश असून प्रथमच या ग्रामपंचायतीत थेट जनतेतुन सरपंच निवड होणार आहे. तसेच प्रथमच राजकीय पक्षांच्या चिन्हे घेवुन मते मागावे लागणार आहे. यामुळे राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्रांनी अतापासून फिल्डींग लावण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आरक्षित असलेल्या चिन्हाचा वापर होणार नाही. सरपंच पदासाठी पत्रिका चा रंग फिका निळा राहणार आहे. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत चार मते घावे लागणार आहे व एक मत सरपंच पदासाठी व अन्य मते सदस्य दयावे लागणार आहे. सरपंचपदासाठी इयता सातवी पास असणे आवश्यक आहे. यासाठी पुरावा सादर करावा लागणार आहे. ही अट १/१/१९९५ नंतरचा उमेदवारांना लागु होणार आहे.

घोडे बाजाराला बसणार आळा
सरपंच थेट जनतेतून होणार आहे. ३३पैकी २०ग्रामपंचायतीवर महिला सरपंच निवड होणार आहे. २० ग्रामपंचायतींवर महिला सरपंचाचे आरक्षण असल्याने ६६% महिला असणार आहे. त्यामुळे अर्ध्रांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. या अगोदर निवडून आलेल्या सदस्यामधुनच सरपंच निवडला जायचा. ज्या पँनेलकडे बहुमत त्याचा सरपंच व्हायचा. बहुमतसिध्द करण्यासाठी सदस्यांची पळवा पळवी केली जात होती. यातुन आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार होऊन घोडे बाजार व्हायचा. परंतु थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय राज्र शासनाने घेवून या घोडे बाजाराला जणु काही लगामच लावण्याचे दिसुन येते.