नवी दिल्ली- केंद्र सरकारची जन-धन योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सुरुवातीला ६ कोटी ग्रामीण आणि १.५ करोड शहरी लोकांची बँक खाते उघडून देण्याचे लक्ष होते. मात्र त्यानंतर ३३.५ कोटी बँक खाती सुरु करण्यात आली. त्यातील सद्यस्थितीत २५.६ कोटी खाती सक्रीय आहे. दोन वर्षात एकदा जारी ट्रांजेक्शन झालेले असेल तरी ते खाते सक्रीय आहे असे मानले जाते. त्यामुळे जवळपास ७६ टक्के खाती सक्रीय आहे.
जन-धन खात्यात ८५ हजार ४९४ कोटी रुपये जमा आहे. जन-धन योजनेंतर्गत ६५ लाख खातेधारकांना ओवरड्राफ्टची सुविधा दिली, त्याद्वारे ३४० कोटी रुपये काढण्यात आहे.
२६ कोटी रूपे कार्ड देण्यात आले.