३७० चे ‘डील’ नेहरूंनी केले पटेलांनी नाही: शहा

0

नवी दिल्ली: आज केंद्रातील मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू-काश्मीरला लागू असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल आहे. ३७० कलम रद्द करण्यात येऊन जम्मू-काश्मीरमधून लद्दाक राज्य वेगळे होणार आहे. दरम्यान ३७० कलम रद्द करण्यावर राज्यसभेत चर्चा सुरु आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ३७० लागू करण्याची शिफारस केली होती असे चर्चेदरम्यान विरोधकांनी सांगितले होते, यावर उत्तर देतांना गृहमंत्री अमित शहा यांनी ३७० चे डील सरदार पटेल यांनी नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केल्याचे सांगितले.

३७० कलम हटविण्यासाठी आजपर्यंत कॉंग्रेस सरकारने प्रयत्न केले नाही. नेहमी काश्मिरी जनतेला खितपत ठेवण्याचे काम कॉंग्रेसने केले असे आरोपही अमित शहा यांनी केले. काश्मीर हे याआधी देशाचे स्वर्ग होते, आहे आणि राहील असेही अमित शहा यांनी सांगितले.