नवी दिल्ली: केंद्र सरकारने ऐतिहासिक असा निर्णय घेत कलम ३७० रद्द केले आहे. या निर्णयामुळे आता जम्मू-काश्मीर राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा नसणार आहे. मात्र या निर्णयाचे दुष्परिणाम होतील असे बोलले जात होते. परंतु वास्तविक बघता, कलम ३७० रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मिरात एकही वाईट घटना घडली नाही. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात ‘कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होईल याचा माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. या निर्णयामुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाही हे मी ठाम सांगू शकतो, उलट कलम रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर विकासाच्या मार्गावर येईल यात वादच नाही’ असे अमित शहा यांनी सांगितले.