४० फूट उंच पडूनही शेतकरी आपल्या पायावर उभा

0

मुंबई (प्रतिभा घडशी) | आधुनिकतेच्या जमान्यातही चमत्कार घडतात, हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. बाळकृष्ण पालकर या शेतकऱ्याच्या बाबतीत हा चमत्कार घडला असून 40 फूट उंचीवरुन पडूनही बाळकृष्ण आज पुन्हा डॉक्टरांच्या इच्छाशक्तीने आणि स्वताच्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वताच्या पायावर उभे आहेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाळकृष्ण पालकर हे शेतकरी ४० फूट उंच नारळाच्या झाडावरून पडले आणि आणि त्यांच्या पाठीच्या कण्याला आणि पायाला इजा झाली. त्यांना गोव्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या पाठीच्या कण्याची आणि पायाच्या फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया झाली. त्यांचे आरोग्य भविष्यात कसे राहील हे काहीच सांगता येत नव्हते, कारण त्यांच्यात सुधारणा दिसत नव्हती. ते बसू किंवा उभे राहू शकत नव्हते. संपूर्ण काळ ते अंथरुणाला खिळून होते. पालकर यांच्या नातेवाईकांना पेशीवर आधारित उपचारपद्धतीबाबत माहिती त्यांच्या वाचनात आली. त्यांनी स्टेमआरएक्स बायोसायन्सेस सोल्युशन्स प्रा. लि.चे डॉ. महाजन यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आणि ते एप्रिल महिन्यात मुंबईला आले. मे महिन्यात त्यांना स्टेमआरएक्समध्ये दाखल करण्यात आले आणि तेव्हापासून त्यांनी पेशीवर आधारित उपचारपद्धतीची तीन सत्रे घेतली आहेत.
उपचारांनंतर आता पालकर कुणाच्याही मदतीशिवाय आरामात बसू शकतात आणि लेग स्प्लिंट्स व वॉकरच्या आधारे उभे राहतात.

डॉक्टर काय म्हणाले
स्टेमआरएक्स बायोसायन्सेस सोल्युशन्स प्रा. लि.मधील रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर डॉ. प्रदीप व्ही. महाजन म्हणतात, “त्यांच्या पाठीच्या कण्यात आणि पायाच्या स्नायूंमध्ये विलक्षण सुधारणा दिसून आली आहे. त्यांना वॉकरच्या आधाराची आवश्यकता लागते, पण ते स्वत:हून उभे राहू शकतात आणि चालू शकतात. जेव्हा ते दाखल झाले होते, तेव्हा अंथरुणाला खिळून होते. त्या परिस्थितीशी तुलना करता थोड्या काळात झालेली ही महत्त्वाची सुधारणा आहे.

“येथे दाखल होण्यापूर्वी माझ्या पायांमध्ये आणि पाठीमध्ये कोणत्याही प्रकारची संवेदना जाणवत नव्हती. जेव्हा मला बसावेसे वाटत असे तेव्हा माझे नातेवाईक छताला एक कापड टांगत आणि त्याला पकडून ठेवून मी बसत असे. मला आरामात बसताही येत नव्हते. पण आता मला पूर्वीसारखे आरामदायी वाटत आहे. काही काळाने माझी प्रकृती एकदम सामान्य होईल, याची मला खात्री आहे.” असे बाळकृष्ण पालकर म्हणाले.