पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
चाळीसगाव – लग्नात मानपान दिला नाही, घर बांधण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहीतेचा छळ करुन मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील पतीसह सासरकडील ६ जणांवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, १२ एप्रिल २०१६ रोजी त्यांचे लग्न झाल्यानंतर फक्त ८ दिवस त्यांना चांगले वागवले, त्यानंतर लग्नात मानमान दिला नाही, भिकाऱ्यासारखे लग्न लावुन दिले, असे टोचुन बोलुन त्यांचा छळ सुरु केला पती समाधान राघो मोरे हे दारु पिवुन शिवीगाळ करुन मारहाण करीत असत नणंद अनिता रमेश पाटील व मावस बहीण संगीता शांताराम पाटील दोन्ही रा. शिवशक्ती नगर कृष्णापुरी पाचोरा या पतीला फारकत देण्यासाठी सांगत ते तसेच सासरे राघो विठ्ठल मोरे, सासु रजुबाई राघो मोरे यांच्या सांगण्यावरुन घराच्या बांधकामासाठी ५० हजार रुपये माहेरुन आणावेत म्हणुन शारीरिक मानसिक छळ करुन १५ जानेवारी २०१७ रोजी माहेरी हाकलुन दिले व १६ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथे वरील आरोपी येवुन त्यांना शिवीगाळ करुन ५० हजार रुपये घेवुन आल्यावर नांदायला ये असे बोलुन चापटा बुक्यांनी मारहाण करुन पैसे आणले नाही तर तुला जिवंत जाळुन टाकु अशी धमकी दिल्याचे म्हटले आहे तर संजय गांधी नगर येथील प्रतिभा हेमंत भोसले यांच्या विरोधात देखील फिर्यादीत उल्लेख केला आहे याप्रकरणी वरील ६ आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.