जळगाव: आयुष्याचा ध्येय तुम्ही ठरविलेले आहे, त्या ध्येयाला अनुसरून मार्गक्रमण करत रहायच़ं आहे़ जसा धु्रवतारा हा आकाशात अढळपद प्राप्त करून बसलेला आहे, त्याप्रमाणे आपल्या ध्येयाकडे अढळपणे लक्ष असू द्या, अन् संकटांवर मात करत यश मिळवा, असे प्रतिपादन नागपुर येथील डॉ़ शुभाताई साठे यांनी केले़
ब्राम्हण सभातर्फे रविवारी सायंकाळी ४़३० वाजता ब्राह्मण समाजातील ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभा येथे पार पडला़ त्यावेळी त्या बोलत होत्या़ याप्रसंगी व्यासपीठावर ब्राम्हण सभेचे अध्यक्ष अॅड़ सुशील अत्रे, उपाध्यक्ष नितीन कुळकर्णी, आऱआऱ वैद्य उपस्थित होते़ डॉ़ साठे यांच्या हस्ते दिप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली़ प्रास्ताविक सुशील अत्रे यांनी केले़
गुणगौरव सोहळ्यात ब्राह्मण समाजातील दहावी, बारावी, सीईटी, सीपीटी, बीएससी, तसेच बीक़ॉम, डिप्लोमा, बी़ई़ एम़ए, बीएएमएस, बी़टेक, एम़एस़ सी, एम़टेक चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ़ शुभाताई साठे यांच्या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पोरितोषिक देऊन सत्कार करण्यात आला़ सूत्रसंचालन मीरा गाडगीळ यांनी केले़ चिटणीस संजय जोशी यांनी म्हटलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली़ आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष अमोल जोशी यांनी केले़ यावेळी संदीप कुळकर्णी, केदार देशपांडे, जितेंद्र याज्ञीक, अॅड़ दत्तात्रय भोकरीकर, शामकांत कुळर्क्णी किरण कुळकर्णी, राजेंद्र कुळकर्णी, रेखा कुळकर्णी, सदानंद गाडगीळ आदी उपस्थित होते़