मुंबई: देशातील सर्वात मोठे उद्योग समूह असलेल्या रिलायन्स समूहाची आज सर्वसाधारण सभा पार पडली. यात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर्षापासून गिगा फायबरची ५ लाख घरात प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक आकाश अंबानी आणि निशा अंबानी यांनी ही घोषणा केली.