बुंदी – राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातून ५ वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये बंदिस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीचे नाव जुगराज भिल असे असून, तो बुंद जिल्ह्यातील रामपुरिया गावचा रहिवासी आहे. भिल याला पाकिस्तानमधील कराची तुरुंगामध्ये बंदिस्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले, की संबंधित व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे. आम्ही त्याला पाकिस्तानमध्ये बंदी म्हणून ठेवण्यात आल्याची माहिती कळवली आहे.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर भिल यांच्या कुटुंबियांनी त्याच्या सुटकेसाठी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. भिलच्या वडिलांनी सांगितले, की ५-६ वर्षांपूर्वी जुगराज एक दिवस रात्री उशिरा आपल्या घरातून गायब झाला. पोलिसांनी दाखवलेल्या कागदपत्र व फोटोवरून तो तेथे असून लवकरत परत घरी येईल अशी सकारात्मक आशा आहे.