मागणीच्या फक्त २८ टक्के मदत प्राप्त
जळगाव – जिल्ह्यातील 6 लाख 34 हजार 368 शेतकर्यांसाठी जिल्हा प्रशासनाने 643 कोटी 64 लाख 52 हजार 289 रूपये मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मागणीच्या केवळ 28 टक्के म्हणजेच 179 कोटी 98 लाख 1000 रूपयांच्या मदतीचे अनुदान जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यांना पहिल्या हप्त्यात केवळ 28 टक्केच मदत मिळणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 6 लाख 34 हजार 368 शेतकर्यांचे 7 लाख 3 हजार 787 हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या स्वाक्षरीने राज्य शासनाच्या सचिवांकडे (मदत व पुनर्वसन महसूल व वनविभाग) यांना जिल्हाधिकार्यांनी सादर केला होता.
मदतीचा पहिला हप्ता प्राप्त
जिल्हा प्रशासनाने शेतकर्यांना मदत स्वरूपात अनुदान मिळावे म्हणून शासनाकडे 643 कोटी 64 लाख 52 हजार 289 रूपये मदतीचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावानुसार राज्यपालांनी शेतीपिकांसाठी प्रती हे. 8 हजार व फळपिकांसाठी प्रति हे. 18 हजार अशी मदत जाहीर केली. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी 179 कोटी 98 लाख 1000 रूपयांचा पहिला हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या अनुदानाचे तातडीने वितरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
नुकसानीची आकडेवारी
फळपिक सोडून जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र
शेतकरी 4 लाख 90 हजार 889, क्षेत्र – 5 लाख 46 हजार 161.57 हे.
फळपिक सोडून बागायती पिकाखालील बाधित क्षेत्र
शेतकरी 1 लाख 32 हजार 896, क्षेत्र 1 लाख 47 हजार 104.98 हे.
फळपिका खालील बाधित क्षेत्र-
शेतकरी 10 हजार 583, क्षेत्र- 10 हजार 520.67 हे.
एकूण- शेतकरी 6 लाख 34 हजार 368, एकूण क्षेत्र 7 लाख 3 हजार 787