७०-३० चा फॉर्मुला रद्द करण्याची मागणी

0
मराठवाडयातील सर्वपक्षीय आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन 
नागपूर :  सरकारने ७०-३० चा फॉर्मुला रद्द करावा आणि समान कायदा-समान नेमणूक आणि गुणवत्तेवर निवड झाली पाहिजे अशी मागणी करतानाच सरकारने याची लवकर दखल घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
यावेळी जनशक्तिशी बोलताना राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे म्हणाले कि, मराठवाडयातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या पक्षाच्या सर्व आमदारांनी ७०-३० च्या फॉर्मुल्याविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. इंजिनिअरींग, मेडिकल कॉलेजच्या विदयार्थ्यांना असा रेषो लावला आहे की, मराठवाडा सोडून ज्या काही जागा असतील त्या उर्वरीत भागासाठी विदयार्थ्यांना मिळतील. आता राहिलेल्या ३० टक्के जागा मराठवाडयासाठी मिळणार आहेत असा अन्यायकारक निर्णय भाजप सरकारने घेतला आहे असा आरोप आमदार भांबळे  यांनी केला. दरम्यान जे हुशार विदयार्थी आहेत ते त्यांच्या कर्तुत्वाने पुढे येतील अशा विदयार्थ्यांना राखीव जागा असल्या पाहिजेत अशी मागणीही  भांबळे यांनी केली.