७ दिवसात अमृतच कनेक्शन घ्या अन्यथा दुप्पट रक्कम भरा

 

जळगाव – मनपा हद्दीमध्ये अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठयाच्या वितरण वाहिनी टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच ज्या नागरीकांना पाणी पट्टी भरल्याची/ नवीन नळसंयोजनाची पावती सादर केली, त्यांना नळसंयोजन अमृत योजने अंतर्गत देण्यात आलेले आहे. ज्या नागरीकांचे अमृत योजनेच्या नळसंयोजनाची जोडणी बाकी असेल त्यांनी ७ दिवसात संबंधीत पाणी पुरवठा युनिट अभियंतायां कडे नळ संयोजनाची अधिकृत पावती व पाणी पट्टी भरल्याची पावती सादर करावी. अन्यथा मुदतीनंतर सदर वितरण वाहिनीची चारी दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात येईल. तद्नंतर आपण नळसंयोजनाची मागणी केल्यास त्याकामी रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या खर्चाच्या दुप्पट रक्कम मनपा खजिन्यात भरणे आवश्यक राहील. तरी नागरीकांनी त्वरीत नळसंयोजन जोडणी करुन घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे महापालिके तर्फे कळवण्यात आले आहे.