मुंबई : सेलिना जेटली बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहे. ‘ए ट्रिब्युट टू रितुपर्णो घोष- सीजन्स ग्रीटिंग्स’ या चित्रपटातून सेलिना बॉलिवूडमध्ये
कम बॅक करणार आहे. या चित्रपटाची कथा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. यात सेलिना मुलीची भूमिका साकारणार आहे तर लिलेट दुबे तिच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.
याबद्दल बोलताना सेलेना म्हणाली, ”मी राम कमल यांच्या ‘सीजन्स ग्रीटिंग्ज’ चित्रपटाचा भाग बनल्यामुळे आनंदित आहे. कारण नेहमीच मी त्यांना सृजनशील व्यक्ती मानले आहे. त्यांनी याची कथा मला दुबईत सांगितली तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता. माझ्या काळानुसार ही कथा माझ्यासाठी योग्य वाटत होती. लग्न आणि नंतर आई झाल्यानंतर मी अशाच विषयाच्या शोधात होते. हे तथ्य लक्षात घेऊनच मी गेली १८ वर्षे एलजीटीबीक्यूआईए आंदोलन (समलैंगिक अधिकार आंदोलन) याच्याशी जोडली गेली आहे आणि रितुदा (रितुपर्णो घोष) आम्हा सर्वांची प्रेरणा आहे. अखेर मी या मुद्द्याशी संबंधित चित्रपटात काम करणार आहे.”