‘८३’चा पहिला लूक प्रदर्शित !

0

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग एक धमाकेदार चित्रपट घेवून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘सिन्बा’, ‘गली बॉय’ अशा एकापेक्षाएक चित्रपटानंतर क्रिकेटवर आधारित रणवीरचा ’83’ चित्रपट चाहत्याचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. प्रदर्शित केलेल्या या पोस्टमध्ये चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांवरून पडदा उठवण्यात आला आहे.

धर्मशाला येथे चित्रपटातील कलाकारांना प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. मागील काही दिवसांपासून रणवीर आणि माजी क्रिकेटर कपिल देव यांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. चित्रपटाची शुटिंग सुरू होण्या आधीच निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. चित्रपट ‘८३’ पुढील वर्षी १० एप्रिल २०२०ला रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाचे शुटिंग १५ मे पासुन सुरू होणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लंडन आणि स्कॉटलँड करण्यात येणार आहे. हा चित्रपट केवळ १०० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.

’83’ चित्रपटामध्ये महान क्रिकेटर कपिल देव यांची यशोगाथा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीरसह पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, चिराग पाटिल, ताहिर भासिन, साहिल खट्टर, आर बद्री, हार्डी संधु, एमी विर्क हे कलाकार मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.