८८४ कोटींचा घोटाळा: भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्याची कोर्टाकडून चौकशीचे आदेश

0

जयपूर: राजस्थानमधील राजकीय नाट्यामध्ये केंद्रीय मंत्री भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांचे नाव अनेकदा चर्चेला आले आहे. राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार पडण्याचा डाव रचित असल्याचे आरोप गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर झाले. कॉंग्रेस आमदारांना फोडण्यासाठीची चर्चा झाल्याचे ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात शेखावत हे कॉंग्रेस आमदार फोडण्याबाबत चर्चा करत असल्याचे सांगितले जात होते. यावरून शेखावत यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. दरम्यान आता संजीवनी पत सहकारी संस्थेतील ८८४ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी गजेंद्रसिंह शेखावत यांची चौकशी करण्याचे आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिले आहे. गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासोबत त्यांच्या काही साथीदारांची देखील यात चौकशी होणार आहे.

राजस्थानच्या राजकीय सत्ता संघर्षात शेखावत यांच्यावर कॉंग्रेसकडून घोडेबाजीचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे ते अनेकदा चर्चेत राहिलेले आहेत.