ॲड. रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 

श्री. गणेश विद्या अभियानास लाभतोय उस्फुर्त प्रतिसाद 

मुक्ताईनगर प्रतिनिधी -….... राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांच्या संकल्पनेनतून विद्येचे अधिपती असलेल्या गणरायांची आराधना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडी तर्फे श्री गणेशा शिक्षणाचा – एक विद्यार्थी एक कार्यकर्ता या घोषवाक्या खाली विद्येची देवता श्री गणेशा च्या उत्सवात शिक्षणा पासून वंचीत उपेक्षितांना विद्येच्या मंदिरात पाठवण्यासाठी

श्री गणेश विद्या अभियान राबविण्यात येत आहे या अभियानात शाळा बाह्य मुलांना परत शाळेत प्रवेश मिळवून देण्यात येत आहे .

 

ॲड रोहिणी खडसे यांनी आवाहन केल्या नुसार या

 

अभियाना अंतर्गत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ता आपल्या आजूबाजूच्या वस्त्या पाड्या , झोपडपट्टी व परिसरातील प्राथमिक शिक्षण सोडलेल्या किंवा शाळेत प्रवेश न घेतलेल्या मुलांचा शोध घेऊन या मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करून शाळा प्रवेशासाठी त्यासाठी पालकांचे मन वळवून त्या विद्यार्थ्याला शाळेपर्यंत नेऊन त्यांचा शाळेत प्रवेश करून देत आहेत या अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद लाभत असून

दि. २४/०९/२०२३ रोजी चिपळूण जि.रत्नागिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या चिपळुण शहर अध्यक्षा दिपिका कोतवडेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,चिपळूण गांधीनगर च्या मुख्याध्यापिका नयना आवटे यांच्या साहाय्याने वडार समाजातील मुलगी कु.वैष्णवी पवार हिला शिक्षणासाठी प्रेरीत करण्यात आले. या मुलीने तिच्या वडीलांच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती दुर्बल असल्या कारणाने शाळेत जाण्यास टाळाटाळ केली.परंतू दिपिका कोतवडेकर यांच्या प्रेरणेमुळे पुन्हा शाळेत जाण्यास सुरूवात केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा शिल्पा फडतरे उपशहराध्यक्षा व वडार समाज अध्यक्ष छाया माने, सरचिटणीस आशा महाडिक, संगिता चव्हाण मिनाक्षी नलावडे, वनिता पवार व महिला आघाडीच्या कार्येकर्त्या उपस्थित होत्या.