1 जानेवारीपासून शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू 

0
एनएसएसओकडून घेतली जाणार माहिती
पिंपरी : कुटुंबाची जमीन आणि पशुधन धारणा व शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्यांकन आणि कर्ज व गुंतवणूक हे सर्वेक्षण 1 जानेवारी 2019 पासून सुरू होणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्यांतर्गत पुणे विभागाच्या नमुना सर्वेक्षण कार्यालया (एनएसएसओ) कडून हे सर्वेक्षण होणार आहे. यासोबतच वेळेचा वापर सर्वेक्षण करण्यात येणार असून प्रथमच अशा प्रकारचे सर्वेक्षण होत असल्याची माहिती ‘एनएसएसओ’चे फिल्ड ऑपरेशन्स विभागाचे उपमहानिदेशक अवदेश कुमार मिश्रा यांनी दिली. 77व्या दौर्‍याच्या शिबिरात अवधेशकुमार बोलत होते. आकुर्डी येथील केंद्रीय सदन येथे हे शिबिर पार पडले. याप्रसंगी पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपनिदेशक श्रीनिवास शिर्के, अर्थ व सांख्यिकी निदेशालायाच्या क्षेत्रीय संयुक्त निदेशक सुजाता अय्यर उपस्थित होते. याप्रसंगी पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपनिदेशक श्रीनिवास शिर्के, अर्थ व सांख्यिकी निदेशालायाच्या क्षेत्रीय संयुक्त निदेशक सुजाता अय्यर उपस्थित होते.
विविध माहिती गोळा करणार
शिबिरामध्ये मार्गदर्शना करताना अवधेशकुमार म्हणाले की, कर्ज आणि गुंतवणूक या सर्वेक्षणाचा वापर भांडवली गुंतवणूक, कर्जबाजारीपणा, ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेची रचना आणि इतर संकेतकांच्या बांधणीसाठी होईल. कुटुंबाचा सर्व्हे करताना, विविध विषयांची माहिती गोळा करण्यात येत आहे. कुटुंबाची जमीन आणि पशुधन धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे मूल्यांकन या सर्वेक्षणाचा उपयोग कृषी, सहकार व शेतकरी कल्याण, पशुसंवर्धन विभाग, शेतकरी आणि मत्स्य व्यवसाय, कृषी खर्च आणि किंमत आयोग (सीएसीपी), राष्ट्रीय लेखा विभाग, विविध संशोधन संस्था आणि धोरण विषयक नियोजन या सर्वांसाठी उपयोगी ठरेल. या चार दिवसीय प्रशिक्षण शिबिरा दरम्यान 100 हून अधिक क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. सर्व नागरिकांना सर्वेक्षणाच्या कामकाजा दरम्यान सहकार्याचे आवाहन ‘एनएसएसओ’ विभागामार्फत करण्यात आले आहे.