सद्यस्थितीत 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करणार्यांचे प्रमाण अधिक असले, तरी गुढीपाडवा हाच नववर्षारंभ असल्याचा प्रसार करून संस्कृतीरक्षण करणार्यांची संख्याही वाढत आहे. 31 डिसेंबरला मेजवानी झाडून नववर्ष साजरे करणारा आणि गुढीपाडवाही साजरा करणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. दोन्ही डगर्यांवर पाय ठेवणार्या अशा हिंदूंनी आत्मचिंतन करून सत्याचा ठामपणे पक्ष घेण्यात आपण का कमी पडतो, याचे चिंतन करणे अपेक्षित आहे.
केवळ नावालाच असणारा नववर्षारंभ 31 डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक जण साजरा करतील. ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्यामध्ये पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाला बळी पडलेल्या हिंदूंचा मोठा वाटा आहे. हिंदु संस्कृतीतील प्रत्येक सण हा तिथीनुसार साजरा केला जातो, मग नवीन वर्षाच्या आरंभाचा दिवस तरी त्याला कसा अपवाद कसा असेल ? गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा हाच हिंदु नववर्षारंभ आहे. गुढीपाडवा नववर्षारंभ असण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणेही आहेत; मात्र धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज अनेक हिंदूंकडूनही 1 जानेवारी हाच नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणून साजरा केला जातो. खास अशा आंग्लाळलेल्या आणि हिंदुत्वाची भावना कमजोर झालेल्या हिंदूंसाठी 1 जानेवारीमागील भंपकपणा आणि गुढीपाडव्यातील भक्कमपणा दर्शवणारी काही तथ्ये खालीलप्रमाणे…
कालगणना
नववर्षारंभ हा कालगणनेशी संबंधित आहे. मुसलमान आक्रमकांनी भारतावर इंग्रजांपेक्षा अधिक काळ आक्रमण करूनही हिंदूंनी हिजरी कालगणना स्वीकारली नाही; मात्र इंग्रजांच्या कमी-अधिक दीड शतकाच्या कालावधीत हिंदू कालगणनेला तीलांजली देऊन अत्यंत अतार्किक ख्रिस्ती कालगणना स्वीकारली. हा हिंदुत्व नाकारणार्या आणि इंग्रजांची चापलुसगिरी करणार्या राज्यकर्त्यांचाच परिणाम ! सध्या प्रचलित असलेली ख्रिस्ती कालगणना सदोष असून पूर्णतः अवैज्ञानिक आहे. या कालगणनेतील सौर वर्षाची लांबी सूक्ष्म मानाने 365 दिवस 5 घंटे 48 मिनिटे 45.37 सेकंद एवढी आहे; पण प्रतीवर्षी ढोबळमानाने 365 दिवस एवढीच धरत असल्याने 4 वर्षांनी एक दिवस (29 फेब्रुवारी) अधिक गृहीत धरला जातो; पण त्यामुळे प्रत्येक 4 वर्षांनी ख्रिस्ती वर्षारंभ 45 मिनिटे पुढे जातो. हा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 100 वर्षांनी फेब्रुवारीची 29 दिनांक धरत नाहीत. कालगणनेतील गोंधळ कमी करण्याच्या दृष्टीने वर्ष 1582 मध्ये ख्रिस्ती धर्मगुरु पोप ग्रेगरी याने ऑक्टोबर 5 हा दिनांक ऑक्टोबर 15 मानावा, असा आदेश दिला. हा आदेश इटली, स्पेन, पोर्तुगाल आदींनी मानला; पण इंग्लंडने मानला नाही. त्यामुळे इंग्लंडचे कालमान 11 दिवस मागे पडले. मागे पडलेली गणना पुढे नेण्यासाठी म्हणून मग वर्ष 1752 मध्ये इंग्लंडच्या संसदेने कायदा करून त्या वर्षीच्या 3 सप्टेंबरला 14 असे समजावे असे घोषित केले. असे झाले, तरी वर्षारंभ कोणता धरावा, यात घोळ होताच. वर्ष 1752 पर्यंत इंग्लंडमध्ये नवीन वर्षारंभ 25 मार्चला होत असे. त्यानंतर तो 1 जानेवारीला होऊ लागला. इंग्रजी कालगणनेत महिन्यांची नावेही रोमन देवता, रोमन राजे आणि आकडे यांच्यावरून पडली आहेत, तर हिंदु कालगणना ही खगोलीय नक्षत्रे आणि गती यांवर आधारित आहेत. विश्वाची उत्पत्ती-स्थिती-लय यांचा संदर्भ केवळ हिंदु कालमापनामध्ये आहे. स्वातंत्र्योत्तर काळात 22 मार्च 1957 ला भारताने विक्रम संवत्सराप्रमाणे राष्ट्रीय दिनदर्शिका स्वीकारली. नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे गुढीपाडवा हा नववर्षारंभ असण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक, तसेच आध्यात्मिक कारणे आहेत. वसंत ऋतुचा प्रारंभ या दिवसापासून होतो. तेथूनच सृष्टी नव्याने बहरायला लागते. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला, तो हाच दिवस. या दिवसापासूनच शालिवाहन शक चालू झाले. ब्रह्माने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली. या दिवशी उत्पत्तीशी संबंधित प्रजापती लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येतात. हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा केवळ पृथ्वीवर नाही, तर नागलोक, पुष्पलोक, गोलोक अशा ब्रह्मांडातील सगुण लोकांमध्येही साजरा होतो. कुठे ब्रह्मध्वज म्हणजे गुढी उभारून मंगलमय प्रारंभ होणारे हिंदु नववर्ष, तर कुठे मद्यपान, अमली पदार्थ यांचे सेवन करून आणि केक कापून मध्यरात्री साजरे केले जाणारे ख्रिस्ती नववर्ष !
दोन डगर्यांवर पाय ठेवणार्या हिंदूंसाठी…
सद्यस्थितीत 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करणार्यांचे प्रमाण अधिक असले, तरी गुढीपाडवा हाच नववर्षारंभ असल्याचा प्रसार करून संस्कृतीरक्षण करणार्यांची संख्याही वाढत आहे. 31 डिसेंबरला मेजवानी झाडून नववर्ष साजरे करणारा आणि गुढीपाडवाही साजरा करणारा एक मोठा वर्ग समाजात आहे. दोन्ही डगर्यांवर पाय ठेवणार्या अशा हिंदूंनी आत्मचिंतन करून सत्याचा ठामपणे पक्ष घेण्यात आपण का कमी पडतो, याचे चिंतन करणे अपेक्षित आहे. 1 जानेवारीला नववर्ष साजरे करणे म्हणजे वैचारिक धर्मांतरच आहे. येथील मातीशी मुळीच संबंध नसलेले आणि निधर्मी शासनाने हिंदूंवर लादलेले दिवस पालटले पाहिजेत. सनातन हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, त्यातील ज्ञानभांडार सर्वांपर्यंत पोहोचले, तर स्वतःजवळील हिरे टाकून दगडे मिरवणार्याची बुद्धी कुणाला होणार नाही. त्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे आवश्यक आहे.
– चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387