1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार

0

चोपडा। विविध मागण्यासाठी राज्यातील शेतकरी 1 जून पासून संपावर जानार आहे. परंतु मुख्यमंत्र्यांशी शेतकरी संघटनाच्या पदाधिकार्‍यांची चर्चा सुरु असल्याने शेतकरी संप टळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकरी संपावर जाणारच असे प्रतिपादन किसान क्रांति कृति समितीचे समन्वयक एस.बी.पाटील यांनी तालुकास्तरीय नियोजनाची बैठकित बोलताना केले.

शेतकरी संघटना सक्रीय आंदोलनात उतरणार असून भारत कृषक समाजाचे जगतराव पाटील यांनी पाठींबा दिल्याने व्यापारी देखील व्यापार बंद ठेऊन शेतकर्‍यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले. शिव व्याख्याते संजीव सोनवणे, मेहमूद बागवान, डॉ. राधेश्याम चौधरी, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.डी.डी.बच्छाव होते. संजय चौधरी,शिवाजी पाटील, नाना पाटील, ईश्वर रिधुरे, शैलेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.