पुणे । लायन्स क्लब ऑफ पुणे इको फ्रेंड्स आणि वनराई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ’कॅच देम यंग’ उपक्रमात तीन वर्षांमध्ये 120 शाळांतील 1 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पर्यावरण जागृतीसाठी उल्लेखनीय कामगिरी करण्यार्या शाळांचा यावेळी गौरव करण्यात आला. भेकराईमाता माध्यमिक विद्यालय फुरसुंगी, रामचंद्र राठी माध्यमिक विद्यालय, पुणे, रचना विद्यालय, होळकरवाडी विद्यालयाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच सुशिलाबाई वीरकर हायस्कुल पुणे व संत तुकाराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज देहू या विद्यालयाने उल्लेखनीय कार्यासाठी गौरविण्यात आले.
120 शाळांचा सहभाग
लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या शतकपूर्तिनिमित्त 2014 मध्ये लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंडसने हा उपक्रम हाती घेतला होता. 120 शाळेतील एक लाख विद्यार्थ्यांनी ’रिड्यूस, रियूज अणि रिसायकल’ या तत्वावर आधारीत विविध उपक्रम राबविण्यात आले. वनराईमार्फत दर महिन्याला पर्यावरणाच्या विविध विषयावर शिक्षकांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. पुणे जिल्ह्यातल्या शाळा, महापालिकेच्या शाळा आणि खासगी शाळांनी यात सहभाग घेतला. हा उप्रकम राबविण्यात उपक्रमाचे प्रमुख अनिल मंद्रुपकर, शंतनु पेंढारकर, रमेश कुलकर्णी, माधवी फाटक यांनी विशेष प्रयत्न केले.