जळगाव । फेबु्रवारी महिन्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक झाली. निवडणुकीनंतर एक महिन्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. 21 मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षपदी उज्ज्वला पाटील तर उपाध्यक्षपदी नंदकिशोर महाजन यांची निवड करण्यात आली. आता जिल्हा परिषदे सभापती पदाची निवड बाकी असून येत्या 1 एप्रिल रोजी सभापती पदाची निवड होणार आहे. शनिवारी 1 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेतील शाहु महाराज सभागृहात सभापतीपदाच्या निवडीकरता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.