1 कोटी 28 लाखाचा ऑनलाईन गंडा

0

जळगाव। नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) अ‍ॅपमधील त्रुटींचा गैरफायदा घेत जळगावातील 13 जणांनी बँक ऑफ महाराष्ट्रवर डिजिटल दरोडाच टाकल्याची धक्कादायकबाब बुधवारी समोर आली. जितेंद्र मारुती रिंढे याने बँकेच्या पुल अकाउंटमधील 49 लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये परस्पर वळवून घेतले. दरम्यान, रिंडे याने जळगाव जिल्ह्यातून 1 कोटी 28 लाख रुपयांचा गंडा घातला असून धरणगाव तालुक्यातील पाळधी शाखेतून 73 लाख तर मुक्ताईनगर शाखेतून 6 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबरोबर रंधे याने राज्यभरात 12 ठिकाणच्या बॅँकातून कोट्यावधी रुपये हडप केले आहेत. दरम्यान, रिंडे हा सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान मास्टरमाईंड असलेला जितेंद्र रंधे हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. ‘बीट क्वाईन स्कीम’ या योजनेचे आमिष दाखवून अता मोहमद खान (रा.चिखली) या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याने जळगावच्या सहा जणांना शून्य बॅलेन्सने बॅँकेत खाते उघडायला लावले होते. अशी माहिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.

शहर पोलिस घेणार ताब्यात
यूपीआय अ‍ॅपमध्ये मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून खात्यावर पैसे नसताना एका दिवसाला लाख रुपयांपर्यंत मागणी करण्यात येत होती. याचा गैरफायदा घेत येथील जितेंद्र मारुती रिंढे (रा. चिखली, जि. बुलडाणा) याने मेहरूण भागात राहणार्‍या सात-आठ जणांच्या नावाने खाते सुरू केले. काहींचे बंद पडलेल्या खात्यांचाही त्याने वापर करून घेतला. ज्यांच्या खात्यांचा वापर केला. या प्रकरणी बुधवारी रात्री 13 जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील जितेंद्र रिंढे हा मुख्यसूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर शहर पोलिस त्याला ताब्यात घेणार आहेत. तर धरणगाव आणि मुक्ताईनगर येथेही अशाच पद्धतीने पैसे लाटल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्या ठिकाणीही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तसेच या गुन्ह्यातील इतर संशयीत लाभार्थी आहेत. त्यामुळे त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. दरम्यान, या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असलेला जितेंद्र रंधे हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. ‘बीट क्वाईन स्कीम’ या योजनेचे आमिष दाखवून अता मोहमद खान (रा.चिखली) या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याने जळगावच्या सहा जणांना शून्य बॅलेन्सने बॅँकेत खाते उघडायला लावले. जळगावचे सहा जण खान याचे जवळचे नातेवाईक आहेत. पैस मिळतील या आमिषाने या सर्वानी बॅँकेत खाते उघडले.