1 जून रोजी भोसरीत होणार गौरव समारंभ

0

विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त

भोसरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 1 जून रोजी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा होणार असल्याची माहिती नगरसेवक अजित गव्हाणे यांनी दिली आहे. भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात सकाळी दहा वाजता गौरव समारंभ होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या प्रसंगी राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अजित गव्हाणे, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी मतदार संघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.