जळगाव । निवडणुक आयोगाकडून दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमानिमित्त देशभरात मतदार जनजागृती विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा या हेतून ’स्वीप’ हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शासनाने 1 जुलै रोजी राज्य मतदार दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच 1 रोजी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मतदार दिनाचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी होत होती. अखेर मतदार दिनाचा निर्णय मागे घेण्यात आला असून 1 जुलै एैवजी 5 जुलै रोजी मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. शासनाने यासंबंधी 8 जून रोजी शासननिर्णय जारी केले आहे. वसंतराव नाईक हे बंजारा समाजाचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जन्मदिनी मतदार दिन साजरा करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा त्यांच्या कार्याचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत बंजारा समाज बांधवांनी या निर्णयाचा विरोध केल्याचे दिसुन आले होते.