जळगाव । प्राथमिक शिक्षकाचा दरमहिन्याच्या 1 तारखेला पगार व्हावा असा शासन निर्णय असतांना सुध्दा 20 तारखेच्या पुढे पगार होत असल्याने प्राथमिक शिक्षकांचा नियममित 1 तारखेला पगार करण्यात यावा अशी मागणी शिक्षकसेनेतर्फ करण्यात आली आहे. या मागणीबाबत आज शिक्षकसेनेतर्फे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
दर महिन्याचा पगार नियमित होत नाही. ऑगस्ट महिन्यांचा पगार अद्याप झालेला नाही. तसेच दर महिन्यात उशिराने पगार होत असल्याने शिक्षक आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे प्राथमिचे जिल्हाध्यक्ष ईश्वर सपकाळे, जिल्हा सरचिटणीस राधेश्याम पाटील, उपाध्यक्ष नाना पाटील, प्रसिध्दी प्रमुख राजेश जाधव, सचिन सरकटे, नरेंद्र सपकाळे, किशोर पाटील, प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते.