औरंगाबाद : शेतकर्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले असून, 1 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. औरंगाबादमध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संप करणार असल्याची घोषणा शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. शेतकरीवर्गाच्या ज्या विविध मागण्या होत्या त्याची सरकारने पूर्णपणे अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला.
त्यामुळे 1 मार्चपासून पुन्हा शेतकरी असहकार आंदोलनावर जातील आणि शासन आणि नागरिकांना सहकार्य करणार नाही. ग्रामीण भागातून कोणतीच बाब शेतकरी शहरात येऊ देणार नाही, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला आहे.