अमळनेर महसूल विभाग व अंबर्शी टेकडी गृप व सामाजिक संघटनेचा उपक्रम
अमळनेर– महसूल विभाग व अंबर्शी टेकडी गृपतर्फे व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने 8 रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी अवघ्या 1 मिनिटात एक हजार एकशे अकरा झाडे लावण्यात आली. तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्ष साकारली. अंबर्शी टेकडीवर झालेल्या गर्दीने टेकडीच्या सौंदर्यात अधिकच भर पडली होती. शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत एकत्र भरपूर झाडे लावण्यासाठी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी अंबर्शी टेकडी गृपच्या सहकार्याने एक मिनिटात 1111 झाडे लावण्याची संकल्पना मांडली त्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने 500 रोपे व कर्मचारयांची शारीरिक मदत दिली. सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन विभाग , मंगळ ग्रह संस्था, सानेगुरुजी शाळा, डी.आर.कन्याशाळा, आर्मी स्कूल, एनसीसी, एनएसएस , मारवड विकास मंच, माझं गाव माझं अमळनेर, पोलीस पाटील संघटना, जवखेडा विकास मंच , तलाठी संघटना, महिला मंच , खाशी मंडळ, अर्बन बँक, पाडळसरे संघर्ष समिती या विविध संघटनांनी गणवेषात हजेरी लावून ओमच्या मंत्रोच्चारात एक मिनिटात एकाच वेळी झाडे लावली. नगरपरिषदेचे अनमोल सहकार्य लाभले नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांनी झाडांसाठी खड्डे खोदून दिले तसेच झाडे लावल्यानंतर रोपांच्या प्लास्टिक पिशव्या व तेथील कचऱ्याची सफाई केली व पाण्याच्या बंबाच्या साहाय्याने लावलेल्या झाडांना पाणी मारण्यात आले. माजी आमदार साहेबराव पाटील व नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी 11 हजार एकशे अकरा रुपये , जवखेडा सरपंच सुभाष पाटील यांनी एक हजार एकशे अकरा , नगावचे माजी सरपंच बापू कोळी यांनी एक हजार रुपये मदत केली तर जवखेडा विकास मंच व विशाल शर्मा यांनी उपस्थित विद्यार्थी व संघटना यांनी उपहाराचा खर्च दिला. यावेळी आयकर अप्पर उपायुक्त संदीप साळुंखे , माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील , माजी प्राचार्य डॉ.ए.जी.सराफ, डॉ एस आर चौधरी, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, डॉ.अनिल शिंदे , सामाजिक वनीकरणचे संतोष बोरसे व शहरातील सर्व स्तरातील संघटना व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हजर होते अंबर्शी टेकडीला यात्रेचे स्वरूप आले होते. झाडे लावल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी नाचत-गाजत आनंद व्यक्त केला.